जालना: वाहतूक शाखेची विशेष मोहीम; वाहतूक नियम उल्लंघन करणार्या 120 दुचाकीस्वरावर दंडात्मक कारवाई
Jalna, Jalna | Oct 9, 2025 शहरातील वाढत्या वाहतूक नियम उल्लंघनावर अंकुश आणण्यासाठी आज जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, तुटलेल्या नंबर प्लेट तसेच अल्पवयीन चालक अशा विविध प्रकारच्या नियमभंग करणार्या दुचाकी वाहनचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.