मच्छीमारी करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सरकारचे आणि कायद्याचे संरक्षण मिळणे ही गरज असून, 'नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्थेच्या' स्थापनेमुळे हे कवच आता स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोंबडभुजे येथे केले. कोंबडभुजे येथे नव्याने नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमारांच्या संघर्षाची जाणीव करून दिली.