ओळखीच्या व्यक्तीकडून महिलेला धमकी व बदनामीचा धक्कादायक प्रकार पेण परिसरात उघडकीस आला आहे. पेण पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पासून 12 डिसेंबर 2025 पर्यंत आरोपीताने महिला फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु नंतर आरोपीताने लग्न करण्यास नकार दिला. महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितल्यावर आरोपीताने तिला धमकावले आणि “तुझे दुसरे कोणाशीही लग्न मी होऊ देणार नाही” अशी स्पष्ट धमकी दिली.