पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कामोठे परिसरात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार नीलम मयूर मोहिते, प्रदीप गजानन भगत आणि हॅप्पी सिंग यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे सेक्टर ११ मध्ये प्रचार करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.