काटोल: काटोल ग्रामीण रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त नारी या अभियाना अंतर्गत महिलांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Katol, Nagpur | Sep 26, 2025 काटोल ग्रामीण रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त नारी या अभियानाच्या अंतर्गत महिलांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्राच्या एकूण आरोग्यदृष्टीची सकारात्मक बदल घडविणे आणि महिलांच्या सर्वांगीण सशक्तिकरणास चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी आमदार चरण सिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विविध महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्यांसह महिलांना तज्ञ डॉक्टरांनी सल्ला देखील दिला.