वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाजवळील प्रसाधनगृहात आढळून आलेले मृत अर्भक हे रुग्णालयातील नसून बाहेरून आणले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. घटनेनंतर रुग्णालयातील सर्व वॉर्डमधील गरोदर माता व नवजात बालकांची सखोल तपासणी करण्यात आली असून एनसी, पीएनसी, केएमसी, लेबररूम, एलएससीएस व एसएनसीयूमधील सर्व बालके सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत अर्भक पुरुष जातीचे असून शवविच्छेदन करून डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. या प्रकरणी व