राधानगरी: कुंभोज सौर ऊर्जा प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक, बिनपरवानगी लाईन टाकण्यावरून ठेकेदाराची दादागिरी
कुंभोज येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत पुरवठा लाईन टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर दबाव आणत जबरदस्ती करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडले असून,प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ग्रामस्थांच्या मते,प्रकल्पासाठी होणाऱ्या विद्युत लाईन टाकण्याचे काम स्थानिकांच्या शेतातून व घराजवळून बिनपरवानगी सुरू करण्यात आले.याबाबत कुठलीही पुर्वसूचना दिली गेली नाही.