जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात "क्षितिज" वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. नेहमीच नाविण्याचा ध्यास घेणाऱ्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात "क्षितिज गीतामृत" ही थीम घेवून वार्षिक स्नेहसंमेलन सादर केले गेले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या या विद्यालयात "क्षितिज गीतामृत" या थीम अंतर्गत विविध विषयांवर नृत्याविष्कार सादर केले गेले.