भोकरदन: पोलीस ठाणे येथे असलेल्या काही खोल्यांच्या छताला पडल्या भेगा, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील भोकरदन पोलीस ठाणे येथे असलेल्या काही खोल्यांच्या छताला भेगा पडल्या आहेत तसेच स्लॅबच्या आसाऱ्या सुद्धा उघड्या पडल्या असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे, मात्र अशा परिस्थितीतही या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी दिवस रात्र एक करत नागरिकांना कायदेशीर रित्या सेवा देत आहे या सर्व बाबीकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन या खोल्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सध्या जोर-धरत आहे.