राजूरा: राजुरा हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत काल रात्री 10 वाजता अवैधरीत्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकुण ₹15,15,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.