रामानंद संप्रदाय रामटेक सेवा केंद्राच्या वतीने रामाळेश्वर मंदिर रामटेक परिसरात जीवनदान महा कुंभ 2026 अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक बारा जानेवारीला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजता पर्यंत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकूण 103 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरातून रक्ताच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली. तसेच ही गंभीर सामाजिक समस्या लक्षात घेऊन रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात आली.