अकोट: तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा;पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळी अंधारात
Akot, Akola | Oct 20, 2025 तालुक्यातील शेतकऱ्यांना अतीवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा असून दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदतनीधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होती मात्र दिवाळीपर्यंत देखील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा कायम आहे. अतिवृष्टीची मदत मिळण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. पिकांच्या नुकसानीमुळे यंदा दिवाळी अंधारात असल्याने बाजारातील उलाढाली वरून लक्षात येत आहे तर अतिवृष्टीच्या मदतीची शेतकरी वाट पाहत असतानाच मात्र मदतीला विलंब झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.