अकोट: शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाद्वारा संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन पार पडले
Akot, Akola | Sep 15, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा यांच्या अध्यक्षतेत संजय राऊत याचा वक्तव्याचा जाहीर निषेध करणयात आला यानिषेध अकोट शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन शिंदे व तालुका अध्यक्ष राजेश भालतिलक यांच्या वतीने निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप कुलट,काशीरामजी साबळे.आनंद अग्रवाल,डॉ.विशाल इंगोले,हरिभाऊ वाघोडे,कैलास थोटे आदी उपस्थित होते.