उत्तर सोलापूर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना बडतर्फ करा: हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांची मागणी...
सोलापुरात हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविरोधात तीव्र भूमिका घेत बडतर्फ करण्याची मागणी बुधवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे. बहिरवाडे यांनी म्हटले की, “देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पदावर बसलेले व्यक्ती हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे निर्णय घेत असतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून गवई यांना पदावरून दूर करावे.”