१ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली आज दि.१ डिसेंबर ला १२ वाजता काढण्यात आली. या वर्षीचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू !’ असे आहे.