छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ओअॅसिस चौकात सोमवारी दुपारी भीषण अपघातात २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या डोळ्यांसमोरच तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिली. यात दोन जण थोडक्यात बचावले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.