पातुर: पातुर बाळापुर विधानसभा क्षेत्रातील देगाव मानकीत विहिरीत अडकलेल्या कोब्रा सापाला सर्पमित्रांचे जीवदान
Patur, Akola | Oct 21, 2025 देगाव मानकीत विहिरीत अडकलेल्या कोब्रा सापाला जीवनदान दिले बाळापुर तालुक्यातील देगाव मानकी गावात मागील तीन दिवसांपासून विहिरीत अडकलेल्या पाच फूट लांबीच्या कोब्रा सापाला सर्पमित्र चिकू इंगोले आणि ओम उंबरकार यांनी जीवदान दिले. केशव रविकिरण भोंगे यांच्या कृषी साहित्य गोदामाजवळील विहिरीत हा साप पाण्यात पडलेला दिसला होता. माहिती मिळताच सर्पमित्रांनी तब्बल एक तासांच्या प्रयत्नांनंतर मोठ्या सीताफिने विषारी सापाला सुरक्षित बाहेर काढले.