कन्नड: चंद्रकांत खैरेंच्या कट्टर शत्रूचा ठाकरेंच्या पक्षात लवकरच प्रवेश : अंबादास दानवेंनी 'मातोश्री'वर जाऊन लावली फिल्डिंग
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 'वापसी' होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाधव यांना घेऊन शुक्रवारी थेट मातोश्री गाठली. काही दिवसांपूर्वी दानवे हे हर्षवर्धन जाधव यांच्या घरी गेले होते. तिथे या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती. जाधव यांचा संभाव्य पक्षप्रवेश माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्का मानला जात आहे. त्यामुळे खैरेंकडून आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास या प्रवेशाला तीव्र विरोध व्यक्त केला