जालना: कर्तव्यदक्ष गुन्हे शोधक श्वान ‘लुसी’ला शासकीय इतमामात अखेरचा निरोप; पोलीस दलात हळहळ
Jalna, Jalna | Apr 3, 2026 जालना पोलीस दलातील गुन्हे शोधक श्वान ‘लुसी’ हिचे दीर्घ आजारामुळे आज सकाळी निधन झाले. तिच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लुसीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून तिला अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत श्वान पथकात कार्यरत असलेली लुसी सन 2018 मध्ये सेवेत दाखल झाली होती. पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात तिने 9 महिन्यांचे गुन्हे शोधक मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले होते.