उत्तर सोलापूर: प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड 19 ऑक्टोबरला येत आहे सोलापुरात...
माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव माने सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड यांचा सुरेल कार्यक्रम 19 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता के. एल. ई. स्कूल, जुळे सोलापूर (डी-मार्ट जवळ) येथे होणार असून रसिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता सोशल मीडिया द्वारे केले आहे. सोलापुरातील रसिकांसाठी ही एक सुरेल मेजवानी ठरणार आहे.