औसा: तेरणेच्या पुराचा तडाखा : औसा तालुक्यातील उजनीत पाणी शिरले, महामार्ग वाहतूक विस्कळीत
Ausa, Latur | Sep 15, 2025 औसा -तेरणा नदीला गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे औसा तालुक्यातील उजनी गावात पाणी घुसले आहे. नदीच्या पाणीपातळीत झालेल्या अचानक वाढीमुळे गावातील खालच्या वस्ती भागात नागरिकांना हलवावे लागले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसारउपयोगी साहित्य भिजले असून, शाळा व दुकाने देखील पाण्याखाली गेली आहेत.या पुरपरिस्थितीचा थेट परिणाम तुळजापूर–औसा तसेच लातूर–सोलापूर महामार्गावर झाला आहे. उजनीजवळील पुलाजवळ पाणी साचून रस्त्याचा काही भाग वाहून गेला.