भडगाव: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून मराठा बांधवांनी केला आनंदोत्सव साजरा,
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने भडगाव शहरातील मराठा समाज व इतर समाजातील व्यक्तींनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 10:00 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव व इतर समाज बांधव एकत्र जमले आणि त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचे यावेळी दिसून आले.