गेवराई: शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या. सिंदफना परिसरात खासदार सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना सरकारकडे मागणी केली
Georai, Beed | Sep 24, 2025 बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शासनाला तात्काळ शेतकऱ्यांसाठी सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावरून बोलताना म्हणाले की, बीड जिल्हा हा सर्वाधिक पूरग्रस्त झाला असून सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.