‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो!’ या पारंपरिक घोषणेनं आज मोहा परिसर दुमदुमून गेला. बलिप्रतिपदा दिनानिमित्त अखिल भारतीय किसान सभा, बीड यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आज मोहा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अतिवृष्टीमुळे झालेलं पिकांचं नुकसान, सोयाबीन आणि इतर पिकांना हमीभाव, वीजदरवाढ, वीजपुरवठ्याच्या समस्या, शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानातील विलंब या प्रमुख मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.