हवेली: सततचा अपमान आणि शेवटी गळफास! वडमुखवाडीत आत्महत्येचं कारण ठरली सोसायटी
Haveli, Pune | Sep 30, 2025 सोसायटी मधील सदस्यांनी वारंवार अपमानित करून मानसिक खच्चीकरण केल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 27) वडमुखवाडी येथे घडली.कैलास विलास भोसले (वय 42, रा.वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.