जालना: दिव्यांगांच्या हक्कासाठी नगरसेवक इमरान खान यांचे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन*
Jalna, Jalna | Jul 17, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक इमरान खान अमानउल्ला खान यांनी दिव्यांग नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुढाकार घेत महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांना निवेदन सादर केले आहे. जालना शहरातील दिव्यांगांच्या प्रश्नांवर अधिकृतपणे निवेदन देणारे ते पहिले नगरसेवक असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. नगरसेवक इमरान खान यांनी दिलेल्या निवेदनात जालना शहरातील पात्र दिव्यांग नागरिकांना घरकुल योजना व घरासाठी जागा उपलब्ध करून देणे, मालमत्ता करामध्ये ५० टक्के सवलत देणे तसेच दरमहा मानधन स