श्री जय हनुमान महिला भजन मंडळ, गोविंद नगर वर्धा यांच्या वतीने गीताई नगर येथे भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे.या सोहळ्याला खासदार अमर काळे यांची उपस्थिती होती,खासदार अमर काळे यांनी भागवत कथेचे दर्शन घेत आरती केली,तसेच उपस्थितांना संबोधित केले.कथा प्रवचनानंतर दररोज महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आले आहे.