शिरोळ: जयसिंगपूरधील भीमसृष्टी व कुरुंदवाडमधील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संजय पाटील यड्रावकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.तर कुरुंदवाड येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता व्यक्त केले.