महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याचा परिपाक म्हणूनच जिह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत या अभियानादरम्यान लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2025 या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींची तब्बल 90 कोटी 77 लाखांची वसुली आहे. या वसुलीमुळे ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. रायगड जिल्ह्यात शासनाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टीची मोठी थकबाकी राहिल्याने या अभियानांतर्गत थकबाकी भरणासाठी ग्रामपंचायतींतर्फे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.