पेठ: तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांची महिलांसाठी राखीव गणांची आरक्षण सोडत करण्यात आली जाहीर
Peint, Nashik | Oct 13, 2025 जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत पेठ पंचायत समितीच्या चार गणांमधील महिला आरक्षण सोडतीत धोंडमाळ व कोहोर हे दोन गण अनु.जमाती महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आले आहेत. येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ , तहसीलदार आशा गांगुर्डे - संघवी यांचे उपस्थितीत चिठ्ठीव्दारे सोडत जाहीर करण्यात आली. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी ऋषभ सुनिल पवार यांचे हस्ते चार पैकी दोन चिठ्ठया काढून महिलांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.