पाचोरा: ढगफुटी सदृश्य पावसामुळे जोगेश्वरी खोऱ्यातील येणाऱ्या पाण्यामुळे राजुरी ग्रामस्थांचे मोठे नुकसान शेतीपिकेही उध्वस्त,
दिनांक 16 सप्टेंबर च्या मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जोगेश्वरी खोऱ्यातील येणाऱ्या पाण्यामुळे पाचोरा तालुक्यातील राजुरी गांवातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे, या पावसाच्या पाण्यात मोसंबी, कपाशी व मका पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची गुरेढोरे, कोंबड्या, मृत पावल्या असून शेतीच्या वापरण्यासाठी लागणारी शेती अवजारे तसेच गावातील दुकाने हे देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत.