नागपूर शहर: नागपूर महानगरपालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसी साठी खंडणी, पत्रकार परिषदेमध्ये आमदार ठाकरे यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये आमदार विकास ठाकरे यांनी नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या ज्यावर महानगरपालिकेतर्फे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही. दरम्यान त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये धक्कादायक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. नागपूर महानगरपालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसी साठी खंडणी मागितली जाते असा धक्कादायक दावा आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे