दिग्रस शहरातील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात दिवसेंदिवस नवे गंभीर खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३६ फसवणूकग्रस्तांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या असून, त्यावरून फसवणुकीचा आकडा ७ कोटी ४३ लाख रुपयांवर पोहोचला आहे. मात्र प्रत्यक्षात ही फसवणूक ३० कोटी रुपयांहून अधिक असल्याची जोरदार चर्चा दिग्रस शहरात सुरू आहे. या बाबत ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.