कल्याण: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त कल्याण मधून मदत
Kalyan, Thane | Oct 3, 2025 निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या नुकसानीने हवालदिल झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दिवाळीत आनंद फुलवण्यासाठी कल्याण येथील बेतुरकर पाडा मित्र परिवाराने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. दिवाळी हा सण साजरा करता यावा यासाठी या मित्र परिवाराने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.या उपक्रमांतर्गत, बेतुरकर पाडा मित्र परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येऊन निधी गोळा केला आणि पूरग्रस्त भागातील गरजू शेतकऱ्यांसाठी आवश्यक वस्तू आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य जमा केले.