अकोट: श्री नरसिंग विद्यालयात 'वंदे मातरम्' प्रदर्शनी चे उद्घाटन;सार्ध शताब्दी वर्षाचे औचित्याने आयोजन
Akot, Akola | Nov 7, 2025 श्री नरसिंग विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आकोट येथे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् रचनेला १५० वर्षे झाल्याच्या प्रित्यर्थ सार्धशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित वंदे मातरम् प्रदर्शनीचे उद्धाटन आकोटचे सहायक पोलीस निरीक्षक श्री वानखडे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मनवर हे होते.'वंदे मातरम्' सार्धशताब्दी वर्षाचे आयोजन शासकिय स्तरावर मोठ्या प्रमाणात होते आहे.