मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टीसाठी १८५००/- रू. तर पीक विम्यातून १७०००/- रू. असे एकूण ३५५००/- रू. दिवाळी पूर्वी देणार असा शब्द दिला होता. परंतु दिवाळी सुरू झाली पण एकही शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी मदतीचा एक रुपयाही मिळाला नाही. राज्य सरकारने केवळ पोकळ आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाऊन निषेध करण्यात आला.