तुमसर तालुक्यातील पवनारा येथे दि. 28 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विजय दमाहे यांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक-मालक अरविंद प्रभू कोहळे रा. देवनारा ता. तुमसर याच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.