उल्हासनगर: उल्हासनगरच्या एसएससी कॉलेज रस्त्यावर डोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
उल्हासनगर, कल्याण,डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली पाहायला मिळत आहे. अनेक टोळके चोरी, मारामारी,तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. अशीच एक घटना उल्हासनगर परिसरात घडली आहे. उल्हासनगरच्या एसएससी कॉलेज रस्त्यावर एका टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार मोबाईल कॅमेरा चित्रीत झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.