अमरावती: गाडगे नगर फ्लायओव्हरखाली अडकला कंटेनर, वाहतूक ठप्प
शहरातील गाडगे नगर फ्लायओव्हरखाली सोमवारी मध्यरात्री 16 चाकी कंटेनर अडकला. या घटनेमुळे काही तास वाहतूक ठप्प राहिली. माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जड मालाने भरलेला कंटेनर भरधाव वेगाने येत असताना फ्लायओव्हरखाली अडकला. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्राथमिक माहितीनुसार, ड्रायव्हरला फ्लायओव्हरच्या उंचीचा अंदाज न आल्याने हा