चोपडा: वेले गावात दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू,चोपडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Oct 19, 2025 चोपडा तालुक्यात वेले हे गाव आहे. या गावाजवळून दुचाकी द्वारे नारायण सुखदेव शिरसाठ वय ५९ राहणार मालखेडा ता. अमळनेर हे जात होते त्यांना अध्यात्वानाने धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे नेण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे