अलिबाग: उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे - जिल्हाधिकारी किशन जावळे
Alibag, Raigad | Nov 12, 2025 उद्यम शिलतेतून सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अहमदाबाद उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई पुरस्कृत नावडे पनवेल को ऑफ इंडस्ट्रीज सभागृह पनवेल येथे आयोजित महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पनवेल तहसिलदार मिनल भांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, रायगड जिल्हा बँक तळोजाचे व्यवस्थापक नितेश तोंडसे, उद्योजक विजय लोखंडे, उद्योजक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका राजश्री पाटील उपस्थित होते.