कळमना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे यांनी 28 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुख्यात दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे यांनी दिली आहे