मोहाडी: शास्त्री वार्ड वरठी येथे सावत्र मुलाकडून सावत्र पित्याला मारहाण, आरोपी विरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील शास्त्री वार्ड वरठी येथे एका सावत्र मुलाने सावत्र पित्याला मारहाण केल्याची घटना दि. 20 ऑक्टोंबर रोजी सायं. 9 वाजताच्या सुमारास घडली. यातील फिर्यादी राकेश सुरेशकुमार मेहता हा आपल्या पत्नीच्या मुलाच्या राहते घरी गेला असता पत्नीच्या पहिल्या पतीच्या मुलाने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.