महागाव तालुक्यातील शीरपुल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे आज दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील उबाळे, फुलसावंगी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दुधे, शिक्षण प्रेमी तथा समाजसेवक सचिन उबाळे, प्रल्हाद भवरे, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सर्व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्राची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते केली.