नागपूर शहर: पाचपावली पोलीस ठाण्यात हरवलेले 27 मोबाईल करण्यात आले मूळ मालकांना परत
19 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या यादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून सत्तावीस मोबाईल शोधून काढले आणि मूळ मालकांच्या स्वाधीन केले. या मोबाईलची किंमत दोन लाख 67 हजार सांगण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मोबाईल मूळ बालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले