खामगाव: वामन नगर येथील रेल्वे गेट जवळ अंडरपासचे काम सुरू आहे सदर अंडर पास रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन
वामननगर येथील रेल्वे गेट जवळ अंडरपासचे काम सुरू आहे सदर अंडर पास रद्द करण्यासाठी दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे ,यांच्या नेतृत्वात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले.अंडरपास पूर्ण होत नसेल तर बंद करा अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.गेल्या काही महिन्यापासून वामन नगर रेल्वे गेट जवळ अंडर पास चे काम बंद असल्याने वामन नगर हरी फैल टीचर कॉलनी गजानन कॉलनी यासह या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.