नागपूर शहर: मिहान येथील कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणांनी घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरू
पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील चिटणवीस नगर येथे मिहान येथे कार्यरत असलेल्या तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संकेत मसराम वय 23 वर्ष असे मृतकल्पाचे नाव सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीवरून 29 ऑक्टोबरला संकेत चे आई-वडील आर्णी येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. यावेळी संकेत एकटाच घरी होता. यादरम्यान संकेत ने गळफास घेतला.