आज दिनांक 4 डिसेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून नऊ जणांनी बुधवारी दुपारी दोघांना मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूरच्या राजीव गांधी चौक परिसरात अरबाज फिरोज चाऊस यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिरोज अबदला चाऊस यांनादेखील आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार अरबाज फिरोज चाऊस यांनी पोलिसांत दिली आहे.