नागपूर शहर: राणी दुर्गावती चौकात लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला करण्यात आली अटक
22 ऑक्टोबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील राणी दुर्गावती चौकात लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव अभिताभ डोंगरे असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला आहे आरोपी हा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन फिरत असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे