शनिशिंगणापूर येथे नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव व भाविकांच्या सुविधेसाठी अधिकारी व विभाग प्रमुखांची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बैठक घेतली. पूजा साहित्य जादा दराने विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिला.